महायुतीतील 8 मंत्र्यांना लवकरच डच्चू देण्यात येणार असा दावा सामना या वृत्तपत्रातून करण्यात आला आहे. सामनातून करण्यात आलेल्या दाव्यानुसार मंत्री भरत गोगावले, शिक्षणमंत्री दादा भुसे, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट या शिंदे गटातील मंत्र्यांना नारळ मिळणार आहेत, असं म्हटलं जातंय. तर अजित पवार गटातील धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख प्रकरणात आधीच राजीनामा दिला आहे. त्यानंतर सातत्याने वादग्रत ठरलेले माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळही हिटलिस्टवर आहेत.
भाजपकडून मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या मत्स्यविकास मंत्री नितेश राणे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून सातत्याने वादग्रस्त वर्तन समोर आलं आहे. त्यामुळे त्यांचीही विकेट जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.