एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या मंत्री गिरीश महाजन यांच्याच संपत्तीची चौकशी व्हायला पाहिजे असे खडसे म्हणाले आहेत. एका सेवा निवृत्त शिक्षकाच्या मुलाच्याकडे एवढी संपत्ती कशी? असा सवाल खडसेंनी केलाय. माझा मुलगा गेला, त्याचं मला दुःख आहे. पण महाजन यांना मुलगा नसल्याने ते दुःख यांना कळणार नसल्याचंही एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरुन माझ्या संपत्तीची आतापर्यंत पाच वेळा चौकशी करण्यात आली आहे. माझ्या काय चौकशा करायच्या त्या करा, पण मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी, असे एकनाथ खडसे म्हणाले. तसेच एका सेवा निवृत्त शिक्षकाच्या मुलाकडे एवढी संपत्ती कशी? सा सवाल देखील खडसे यांनी केला आहे. मंत्री गिरीश महाजन यांचा व्यवसाय आहे तरी काय? असा सवालही खडसेंनी केला.