मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि पद्मश्री पुरस्कार विजेते अशोक सराफ यांनी एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतूक केलं.आहे. एकनाथ शिंदे हे विलक्षण कलाप्रेमी माणूस आहेत असे म्हणत अशोक सराफांनी शिंदेंच्या कार्याची प्रशंसा केली. पद्मश्री अशोक सराफ आणि सुलेखनकार अच्युत पालव यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नाट्य परिषदेतील पदाधिकारी अजित भुरे यांच्याप्रतीही अशोक सराफ यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मराठी नाट्य परिषद, नवी मुंबई शाखा आणि बाल रंगभूमी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कलासेवक पुरस्काराने अशोक सराफ यांना सन्मानित करण्यात आले.
आज मोठा विलक्षण दिवस आहे. आयुष्यात कधीतरी या आठवणीने मला जाग येत राहीलं, अस मला वाटतं. पुरस्कार खूप मिळाले. मिळतायत. पण आजचा पुरस्कार सुरुवातीपासूनच विलक्षण होता की मी त्याचं वर्णनही करु शकत नाही. एवढ्या पावसात तुम्ही उभे होता. एक स्पेशल गाडी यातून आम्ही येतो. हे मी कधी विसरु शकत नाही, असे अशोक सराफ म्हणाले. एकनाथ शिंदे यांचे विलक्षण व्यक्तिमत्त्व आणि कला क्षेत्रातील योगदान यांचे कौतुक करताना पद्मश्री अशोक सराफ यांनी त्यांच्या माणुसकी आणि नेतृत्वगुणांचा गौरव केला. एकनाथ शिंदे हे विलक्षण कलाप्रेमी माणूस असल्याचे ते म्हणाले. शिंदे यांनी मराठी चित्रपटसृष्टी, साहित्य आणि संस्कृतीच्या उन्नतीसाठी केलेले प्रयत्न आणि त्यांचा सामान्य माणसाशी असलेला संवाद यामुळे ते जनमानसात लोकप्रिय असल्याचे ते म्हणाले.