वीज दर कमी होणार, ग्राहकांना मिळणार दिलासा

राज्य वीज नियामक आयोगाने महावितरण, टाटा, अदानी व बेस्टसह अन्य वीज वितरण कंपन्यांचे नवीन वीज दर लागू करण्यास शुक्रवारी मध्यरात्री मंजुरी दिली. स्मार्ट मीटर (टीओडी) बसविणाऱ्या औद्योगिक, वाणिज्यिक ग्राहकांना सकाळी नऊ ते सायंकाळी पाच आणि रात्री बारा ते सकाळी सहा पर्यंतच्या वीज वापरास १०-३० टक्के वीजदर सवलत मिळेल, मात्र सायंकाळी पाच ते रात्री १०-१२ वाजे पर्यंतच्या वीज वापरासाठी २० टक्के जादा मोजावे लागतील. म्हणजे त्यांना एका हाताने दिलेला लाभ दुसऱ्या हाताने काढून घेतला जाईल.

महावितरण व अदानी कंपनीचे वीजदर एक एप्रिलपासून सरासरी १० टक्के, टाटा कंपनीचा १८ टक्के तर बेस्टचा वीजदर ९.८२ टक्के कमी होईल. पुढील पाच वर्षात अपारंपारिक क्षेत्रातील सौर व अन्य स्वस्त वीज उपलब्ध होणार असल्याने वीजदर कमी होणार आहेत.

मात्र कृषी ग्राहकांसाठी औद्योगिक, वाणिज्यिक व अन्य ग्राहकांवर पडणारा क्रॉस सबसिडीचा बोजा एक एप्रिलपासून पुढील पाच वर्षात टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचे वीजदर कमी होऊन दिलासा मिळणार आहे. राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी निवासी हॉटेल्स, गेस्ट हाऊस आदींना वाणिज्यिक ऐवजी औद्योगिक ग्राहकांच्या श्रेणीत टाकण्यात आले असून त्यांना वीजबिलापासून दिलासा मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here