केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेने अमेरिकेतील औषधनिर्मिती क्षेत्रातील दिग्गज कंपनी एली लिलीद्वारे उत्पादित होणारे वजन कमी करणारे टीझेंपेटाईड औषध ‘मोनजारो’ भारतात सादर केले आहे. या औषधाच्या मदतीने लोक वजन कमी करु शकणार आहेत. हे औषध भारतीय बाजारात आता विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या औषधाची किंमत किती असेल आणि या कंपनीबद्दल अधिक जाणून घेऊया.
अमेरिकेतील लोकप्रिय फार्मा कंपनी Eli Lilly ने CDSCO ची परवानगी मिळाल्यानंतर भारतात लठ्ठपणा कमी करण्याचे औषध बाजारात आणले आहे. या औषधाचे नाव Mounjaro (tirzepatide) असं आहे. एली लिली अँड कंपनीच्या Mounjaro (tirzepatide) या औषधामुळं मधुमेह आणि लठ्ठपणावर मात करण्यात मदत मिळणार आहे. लठ्ठपणा, वाढते वजन आणि टाइप 2 डायबिटीजच्या रुग्णांसाठी हे औषध तयार करण्यात आले आहे असा दावा कंपनीने केला आहे.
हे औषध एकाच डोजच्या स्वरुपात उपलब्ध आहे. भारतात हे औषधाच्या चिठ्ठीवरही उपलब्ध असेल. २.५ मिलीग्रामची किंमत ३,५०० रुपये आणि ५ मिलीग्रामची किंमत ४, ३७५ रुपये आहे. निश्चित डोजनुसार रुग्णांना दरमहा किमान १४,००० रुपये खर्च करावे लागतील. अमेरिकेत या औषधाची किंमत 1000 ते 1200 डॉलरच्या आसपास आहे. अमेरिकेत हे औषध Zepbound नावाने विक्री केली जाते.