बहुप्रतिक्षित ‘देवमाणूस’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज! मल्टीस्टारर चित्रपटाची उत्सुकता

तेजस देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित मल्टीस्टारर मराठी चित्रपट “देवमाणूस” ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत आणि नुकतेच या चित्रपटात असलेल्या कलाकारांचे पोस्टर्स लाँच करण्यात आलेत. रिलीझ झालेल्या ह्या पोस्टर्स मध्ये आपण चित्रपटाच्या मुख्य पात्रांचे अतिशय मोहक फर्स्ट लुक पाहू शकतो. या पोस्टरमध्ये महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे दिसत आहेत.

पोस्टरमध्ये अभिनेते महेश मांजरेकर ह्यांचा खूपच साधा पण इंटेन्स लुक आपल्याला दिसून येतो, त्यांची भेदक नजर त्यांच्या या भूमिकेची गंभीरता सांगते. अभिनेत्री रेणुका शहाणे ह्यांचा मायाळू, सरळ देखावा आणि मनमोहक लुक लक्ष वेधून घेणारा आहे तर सुबोध भावे ह्यांना पोलिसांच्या हटके भूमिकेत पाहू शकतो तसेच अभिनेता सिद्धार्थ बोडके त्याच्या हसण्याने सिनेमाचं आणि त्याच्या भूमिकेचं रहस्य वाढवतो. हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. मल्टीस्टारर चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये सुद्धा उत्सुकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here