महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या कलाकारांचं एक नवंकोर नाटक रंगभूमीवर आलं; ज्याला सध्या प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, ओंकार राऊत, शिवाली परब, प्रथमेश शिवलकर आणि भक्ती देसाईचं नवं नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आलं. ‘थेट तुमच्या घरातून’ असं या नव्या नाटकाचं नाव आहे.
हेच नाटक नुकतंच प्राजक्ता माळीने पाहिलं आणि तिने सोशल मीडियावर पोस्ट करत कौतुक केलं. प्राजक्ता माळीसह निखिल बने, प्रियदर्शिनी इंदलकर, चेतना भट्ट या कलाकारांनी ‘थेट तुमच्या घरातून’ हे नाटक पाहिलं. याचा फोटो प्राजक्ता माळीने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. तसंच या फोटोवर प्राजक्ताने लिहिलं आहे की, ‘थेट तुमच्या घरातून’ हे नाटक थेट तुमच्या काळजाला हात घालतं. प्रत्येक कुटुंबानं आवर्जुन पाहावं असं नाटक आहे.

कदम कुटुंबाची ही गोष्ट आहे. या नाटकातून शिवाली परब हिने नाट्यसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. या नाटकाची गंमत, तालमीचे किस्से, प्रेक्षकांचं प्रेम आणि बरच काही ऐकण्यासाठी कलाकारांशी साधलेला संवाद नक्की पहा