भारतीय क्रिकेट संघाचा माजी ओपनर शिखर धवनचा आयशा मुखर्जीसोबत घटस्फोट झाल्यानंतर शिखर धवन मुलगा झोरावरला भेटण्यासाठी खूप आसुसलेला आहे. एवढंच नव्हे तर तो मुलाशी बोलू देखील शकत नाही. कारण त्याचा नंबर ब्लॉक करण्यात आला आहे. शिखर धवनला माहित आहे की, त्याचा नंबर आयशाने ब्लॉक केला आहे. तरी देखील मुलाशी बोलण्यासाठी 3 ते 4 दिवसातून नियमित मॅसेज करतो. ANI ला दिलेल्या मुलाखतीत शिखर धवनने हे दुःख व्यक्त केलं आहे. यामुळे त्याच्यावर आलेला भावनात्मक ताण यावर मोकळेपणाने बोलला आहे. एवढंच नव्हे तर या मुलाखतीत शिखर धवनने तो मुलाशी भावनात्मक दृष्टीने आध्यात्मिक पद्धतीने कसा जोडला आहे ते सांगितलं आहे.
शिखर धवनने सांगितलं की, माझा मुलगा आनंदी आणि निरोगी असावा हीच माझी इच्छा आहे. माझा नंबर जरी ब्लॉक केला असेल तरी मी 3-4 दिवसातून न चुकता मॅसेज करतो. आशा नाहीच की, तो हे मॅसेज वाचतील. मॅसेज वाचला नाही तरी काही प्रॉब्लेम नाही. पण संपर्क करणे हे माझं काम आहे. आणि मी ते करतच राहणार आहे.
क्रिकेटरने खुलासा केला आहे की, आपल्या 11 वर्षाच्या मुलाशी जोडून राहण्यासाठी आध्यात्मिक मार्गाची मदत घेतो. त्याला मुलाला पाहून दोन वर्ष झाली असून एक वर्ष झालं त्यानं त्याचा आवाजही ऐकलेला नाही. हे सगळं फार कठीण आहे पण मी यासोबत जगणं शिकलं आहे, असं शिखर याने म्हटलं आहे. तो पुढे म्हणतो, मला त्याची आठवण येते. अध्यात्मिक मार्गाने मी त्याच्याशी जोडलो गेले आहे. मी दररोज या माध्यमातून त्याच्याशी संपर्कात राहतो. मी त्याला जवळ घेतो. मिठी मारतो. मी आध्यात्मिक मार्गाने त्याच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. हा एकच मार्ग आहे ज्याच्या माध्यमातून मी मुलाला परत आणू शकतो.