आयलयनरमुळे डोळ्यांना संसर्ग होण्याची शक्यता

आयलायनर हा रोज केल्या जाणाऱ्या मेकअप रूटिनचा महत्त्वाचा भाग असतो. आजकाल काळा, हिरवा, पांढरा अशा वेगवेगळ्या रंगांचे आयलायनर्स वापरले जातात. हे आयलायनर्स जेल, पावडर, पेन्सिल अशा वेगवेगळ्या स्वरूपात येतात. प्रत्येकाच्या आवडीचा प्रकार आणि ब्रँडही वेगळा असतो. मात्र, सौंदर्य हा मुद्दा बाजूला ठेवून डोळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्यास आयलायनर्समुळे बरीच इजा होऊ शकते.

पापण्यांचा संसर्ग आयलाइनर बहुतेक वेळेस वॉटरशेड लाइनजवळ लावला जातो, जिथे पापण्यांमधील तैलग्रंथी खुल्या असतात. आयलायनर्समधील कणांमुळे या ग्रंथी साचून डोळ्यांना सूज येण्याची शक्यता असते. पर्यायाने पापण्यांचा संसर्ग उदा. stye, chalazion आणि अगदी blepharitis होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे या उत्पादनांमध्ये पॅराबीन आणि इतर रसायने असण्याची शक्यता असते, जी डोळ्याच्या पारदर्शक आवरणाच्या म्हणजे कंजक्टिव्हायलच्या संपर्कात आल्यानंतर डोळ्याला संसर्ग होऊ शकतो. या संसर्गामुळे डोळे लाल होतात, त्यातून पाणी यायला लागतं आणि डोळ्यांना खाज येते. आयलायनरमधील कणांमुळे डोळ्यातील पारदर्शक भाग म्हणजेच कॉर्नियाला घर्षण किंवा दुखापत होते. या घर्षणामुळे खूप वेदना होतात, डोळ्यातून पाणी येते आणि पापण्या उघडणे वेदनादायी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here