सकाळचा नाश्ता म्हंटल की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतात ते पोहे. पोहे हे बहुतेक सगळ्यांनाच आवडतात. पोह्याचा नाश्ता केला की पोट कस भरलेलं राहतं. भारतात अनेक ठिकाणी पोहे हे आवडीने खाल्ले जातात. पोहे हा पटकन तयार होणारा पदार्थ आहे. पण तुम्हाला माहित आहे का, की भारतात पोहे 8 प्रकारे बनवून खाल्ले जातात. जे सामान्य कांदेपोहे प्रमाणेच आरोग्यदायी आणि चविष्ट लागतात. प्रत्येक भागानुसार पोहे बनवण्याची पद्धत वेगळी आहे. पोहे हा आरोग्यदायी नाश्ता समजला जातो. पोह्यात जीवनसत्त्वे, प्रथिने, फायबर आणि लोह मुबलक प्रमाणात असतात. देशभरातील पोह्याचे प्रकार कोणते पाहुयात

महाराष्ट्रीयन कांदापोहे
महाराष्ट्रात कांदा पोहे आवडीने खाल्ले जातात. ज्यात कांद्याचा वापर केला जातो. घरी कुणीही पाहुणे आले की कांदे पोहे हमखास केले जातात.
बटाटा पोहे
बटाटा घालून सुद्धा पोहे बनवले जातात. ज्यात बटाट्याचा वापर केला जातो. हे पोहे गुजरातमध्ये बनवले जातात. हल्ली महाराष्ट्रात सुद्धा बटाटा पोहे खूप प्रसिद्ध आहेत.

बंगाली पोहे
बंगाली पोहे, ज्याला छिरेर पुलाव असेही म्हणतात, संपूर्ण बंगालमध्ये हे पोहे खाल्ले जातात. या पोह्याचा पोत थोडा मऊ असतो. पुलावात ज्या प्रकारे भाज्यांचा वापर केला जातो तसा या पोह्यांमध्ये वापर केला जातो.

इंदोरी पोहे
इंदोर मध्ये हे पोहे प्रसिद्ध आहेत. तुम्ही कधी इंदोरला गेलात तर इंदोरी पोहे नक्की खा. इंदोरी पोह्यात जीरावन नावाचा खास मसाला टाकला जातो जे शेव बरोबर खाल्ले जातात.

नागपूर तर्री पोहे
नागपूरचे तर्री पोहे काळ्या हरभऱ्याच्या तर्रीसोबत सर्व्ह केले जातात. असे पोहे नागपूर मध्ये बनतात. झणझणीत तर्री आणि पोहे हे कॉम्बिनेशन वेगळंच आहे. नागपूरमध्ये गेल्यानंतर हे पोहे खाल्लेच पाहिजे.

दही पोहे
दही पोहे दही भाताप्रमाणे असतात. ज्यात पोहे दह्यामध्ये मिसळले जाते आणि मोहरी, कढीपत्ता, जिरे, हिंग आणि मसाले मिसळले जातात. दही पोहे हे खूप चविष्ट लागतात.