धक्कादायक! सांगलीच्या माजी महापौरांचा आत्महत्येचा प्रयत्न!

सांगलीच्या राजकीय वर्तुळातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर सुरेश पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. त्यांना रुग्णालायात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. त्यांनी आपल्या राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांनी तातडीने हस्तक्षेप करत त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, प्राथमिक माहितीनुसार त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

ज्येष्ठ नेते सुरेश पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या या धक्कादायक पावलानमुळे मात्र सांगलीच्या राजकीय वर्तुळात आणि सामान्य नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चां सुरू झाल्या आहेत. सुरेश पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर जयंत पाटील यांच्याही भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. या राजकीय घडामोडींचा, त्यांच्यावर झालेल्या संभाव्य दबावांचा किंवा वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल असावे का, अशीही चर्चा सांगलीत दबक्या आवाजात सुरू आहे.

त्यांच्या या टोकाच्या निर्णयामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आणि कुटुंबीयांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, घटनाबाबत अधिक तपशील मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अद्याप त्यांनी हे पाऊल का उचललं याबाबत कोणतंही ठोस कारण समोर आलेलं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here