“मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचा आणि कोणाला काढायचे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. तरी रिमोट कंट्रोल अमित शहा यांच्याकडे आहे. मंत्रिमंडळात गोंधळाचे वातावरण सुरू आहे. मी काही दिवसापासून पाहत आहे. चार मंत्री जाणार आहेत,” असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.
“कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट तसेच योगेश कदम आणि संजय राठोड यांना देखील जावं लागेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. “भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य, घोटाळे, पैशांच्या बॅग घेऊन बसणे हे ओझं फडणवीस यांना पेलवत नाही,” असा टोला राऊतांनी लगावला आहे. “देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळ साफसफाईची गरज आहे,” असं राऊत म्हणाले.