मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने अटकेत असलेला गुंड गजा मारणे याला पुणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोथरूड परिसरात मारणे टोळीतील गुंडांनी भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा निकटवर्तीय असलेल्या तरुणाला बेदम मारहाण केली होती. मात्र, या झालेल्या या मारहाणीनंतर पुणे पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले होते.
गजानन मारणे आणि टोळीवर पोलिसांकडून मकोका लावण्यात आला. त्यानंतर गजा मारणेला आज ३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. मारणे याला आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. कोथरुड परिसरात १९ फेब्रुवारी रोजी देवेंद्र जोग या तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी गजानन मारणे याला टोळी प्रमुख म्हणून पोलिसांनी अटक केली होती. आज दुपारी २ वाजता गजानन मारणे आणि टोळीला न्यायालयात हजर केले गेले.