पुण्यात जीबीएस म्हणजे गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजाराचा धोका वाढतोय. पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम झालेल्या तिसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील चौथ्या रुग्णाचा मृत्यू आहे.
पुण्यानंतर राज्यात अनेक भागात जीबीएसचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आता खडबडून जागी झाली आहे.
पुण्यातील नांदेड परिसरातील 60 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला आहे. पुण्यानंतर आता नागपुरात जीबीएसचा धोका वाढत आहे. पुण्यातील सध्याच्या उद्रेकाचे प्रमुख कारण मोठ्या लोकसंख्येसाठी दूषित पाण्याचे स्त्रोत असू शकते.

राज्यात आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर
पुण्यानंतर राज्यातील इतर भागातही रुग्ण वाढत आहे. नागपुरातही जीबीएसचे रुग्ण वाढत आहेत. रुग्णसंख्या आठवर पोहोचली आहे. या आजाराच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेचा वैद्यकीय विभाग सतर्क झाला आहे. महापालिकेच्या दोन रुग्णालयात विशेष कक्षांची स्थापना करण्यात आली. सांगलीत गुइलेन बॅरी सिंड्रोम रुग्णांची संख्या सहावर गेली आहे. सांगली शहरात एक तर ग्रामीण भागात पाच असे सहा जीबीएस रूग्ण आढळून आले आहेत.
कोणतीही लक्षणं आढळल्यास घाबरून न जाता डॉक्टरांशी संपर्क साधण्याच आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे.