तूप आणि गुळाचे फायदे वाचाल तर हे सुपरफूड्स नक्की ट्राय कराल

हगूळ आणि तूप दोन्ही भारतीय स्वयंपाकघरातील महत्त्वाचे घटक आहेत. या दोन्ही गोष्टींचा उपयोग केवळ अन्नाची चव वाढवण्यासाठीच नाही, आरोग्यासाठीही खूप फायदा होतो. गूळ आणि तूप या दोन्हींमधील पोषक तत्त्वे आरोग्यदायी आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्या, तर अर्थातच त्याचे फायदेही दुप्पट होतील. हे फायदे काय आहेत जाणून घेऊ.

गुळाचे पोषण आणि फायदे

गुळाला साखरेचा उत्तम पर्याय मानला जातो. हे शरीराला ताजेपणा आणि ऊर्जा देण्याचं काम करतं. गुळामध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यांसारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. विशेषतः हिवाळ्यात गुळाचं सेवन शरीरात उष्णता टिकून राहते. याशिवाय, गूळ पचनास मदत करतो आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देतो. जर तुम्हाला शरीरात रक्ताची कमतरता जाणवत असेल, तर गूळ हा एक उत्तम उपाय आहे, कारण तो रक्ताची कमतरता दूर करण्यास मदत करतो.

तुपाचे पोषण आणि फायदे

दुग्धजन्य पदार्थ तूप आपल्या आहारात एक महत्त्वाचं अन्न आहे, ज्याची शिफारस डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ करतात. तुपामध्ये असलेले ओमेगा-3 फॅटी ऍसिड, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी इत्यादी आरोग्यासाठी फायदेशीर असतात. ते खाल्ल्यानं हाडं मजबूत राहतात, थंडी आणि सर्दीपासून रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते. यासोबतच मेंदूही सक्रिय राहतो.

गूळ आणि तूप एकत्र खाण्याचे फायदे

पचनक्रिया सुधारते : गूळ आणि तूप दोन्ही पचनशक्ती वाढवण्यास मदत करतात. यामुळे अन्न सहज पचतं आणि बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीसारख्या समस्या दूर होतात. गूळ आणि तूप आतड्यांसाठी खूप फायदेशीर असतात, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोट फुगणे यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत.

ऊर्जा वाढवते : गुळामध्ये नैसर्गिक साखर असते, जी शरीराला झटपट ऊर्जा देते. म्हणूनच जेवल्यानंतर गुळ आणि तूप खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण, यावेळी गूळ आणि तूप खाल्ल्यानं थकवा आणि अशक्तपणा दूर होतो आणि शरीर ताजं वाटतं.

रोगप्रतिकारशक्ती वाढवते : तुपामध्ये व्हिटॅमिन ए आणि ई असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. तसेच, गूळ आणि तूप खाल्ल्यानं सर्दी, खोकला आणि इतर संसर्गाचा धोका कमी होतो.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर : तुपामध्ये असलेले फॅटी ऍसिड त्वचेला आतून पोषण देतात आणि तिला चमकदार बनवतात. तसेच, तूप केस मजबूत आणि चमकदार बनवते आणि केस गळती रोखते.

गूळ आणि तूपचे इतर फायदे : तुपामध्ये कॅल्शियम असतं, जे हाडं मजबूत करतं. तुपामध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड असतं, जे मेंदूसाठी खूप फायदेशीर असतं. याशिवाय, गूळ मासिक पाळीतील वेदना कमी करण्यास मदत करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here