सोन्याच्या आणि चांदीच्या दरात घसरण

सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव बुधवारच्या उच्चांकी ८६ हजार ७३३ रुपयांवरून घसरून ८६ हजार ५४१ रुपयांवर आलाय. म्हणजेच आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात १९२ रुपयांची घसरण झाली. तसेच चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीचा भाव मात्र ३८५ रुपयांनी घसरून ९७ हजार १८१ रुपये प्रति किलो ग्रॅम झालाय. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) हा दर जाहीर केलाय. यामध्ये जीएसटीचा समावेश करण्यात आलेला नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here