सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होत आहे. सोन्याचे दर महागले आहेत. तर एकीकडे चांदीच्या दरातही हलकी वाढ झाली आहे. चांदी ७५ अंकानी वाढून ९७,९२८ रुपयांवर पोहोचलं आहे. हिच परिस्थिती आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील पाहायला मिळाली आहे.
सोनं आंतरराष्ट्रीय स्तरावर ३३७५ डॉलर आणि चांदी ३३ डॉलरने कोसळले आहेत. तर, देशांतर्गंत बाजारात सोनं आज पुन्हा एकदा वधारलं आहे. आज २२ कॅरेट सोन्याचे दर ४९० रुपयांनी वधारले आहेत. तर, २४ कॅरेट सोन्याचे दर ४५० रुपयांनी वाढले आहेत. १८ कॅरेट सोन्याचे दर ४५० रुपयांनी वधारले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसून येत आहे. त्यामागचे कारण म्हणजे अमेरिकेचे टॅरिफ दर.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
१० ग्रॅम २२ कॅरेट ८९,९५० रुपये
१० ग्रॅम २४ कॅरेट ९८,१३० रुपये
१० ग्रॅम 18 कॅरेट ७३,६०० रुपये