सोन्या चांदीच्या दरात तेजी

आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी आल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी सोन्याच्या किंमतीत मोठी उलथापालथ झाली आहे. मिडल ईस्टमधील वाढत्या तणाव आणि कमजोर डॉलर यामुळं पुन्हा सोन्याची चमक वाढली आहे.

MCXवर सकाळी सव्वा दहाच्या दरम्यान गोल्ड फ्युचर १२७४ रुपयांची तेजी दिसली आहे. यामुळं सोन्याचा भाव ९७,९७८ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. काल सोन्याचा भाव ९६,७०४ रुपयांवर बंद झाला होता. चांदी या दरम्यान ७६० रुपयाच्या मोठी वाढीसह १,०६,१५२ रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली आहे. काल १०,०५,३९२ रुपयांवर चांदी बंद झाली होती.

आज सराफा बाजारात २४ कॅरेट सोनं ८८० रुपयांनी महागलं आहे त्यामुळं प्रतितोळा सोनं ९९,२८० रुपयांवर पोहोचलं आहे. तर, २२ कॅरेट सोनं प्रतितोळा ८०० रुपयांनी महागला असून ९१,००० रुपयांवर पोहोचलं आहे. १८ कॅरेट सोन्याच्या दरात ६६० रुपयांची वाढ झाली असून सोनं ७४,४६० रुपयांवर पोहोचलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here