सोन्याच्या दरात आज मोठी घसरण झाली. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. सोनं पार एक लाखांवर गेले होते. मात्र आता सोन्याचे दर पुन्हा एकदा उतरणीला लागले आहेत. त्याचबरोबर चांदीचे दरही उतरले आहेत. ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोन्याचे दर घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. काय आहेत सोन्याचे आजचे दर जाणून घ्या.
अमेरिका आणि चीन यांच्यातील टॅरिफ वॉरमुळं सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ झाली होती. गेल्या काही महिन्यांपासून सोनं चांगलंच वधारलं होतं. कारण सोन्याची मागणी प्रचंड वाढली होती. सोन्याची मागणी वाढल्याने दरही वाढले होते. अनेकांनी सुरक्षित गुंतवणुक म्हणून सोन्याचा पर्याय निवडला होता. मात्र आता अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्ध थांबण्याची चिन्हे आहेत. त्यामुळं सोनं कमी होऊ शकते अशी चर्चा आहे.
आज २२ कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल १,९५० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळं प्रतितोळा सोनं ८६,१०० रुपयांवर पोहोचलं आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात २,१३० रुपयांची घसरण झाली असून प्रतितोळा सोनं ९३,९३० रुपयांवर पोहोचलं आहे. त्याचबरोबर १८ कॅरेट सोन्याच्या दरात १५९० रुपयांची घसरण झाली असून प्रतितोळा सोनं ९०,४५० रुपयांवर पोहोचलं आहे.