सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. MCX वर सोनं आज ५४७ रुपयांनी घसरले आहे. त्यामुळं २४ कॅरेट सोन्याचे दर ९६४४३ रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीदेखील ८७९ रुपयांनी घसरून १०७५५० वर व्यवहार करताना दिसत आहे.
२२ कॅरेट सोन्याची किंमत ५०० रुपयांनी घसरली आहे त्यामुळं प्रतिग्रॅम सोनं ९०,१०० रुपयांवर पोहोचली आहे. १८ कॅरेट सोन्याची किंमत ४१० रुपयांनी घसरून प्रतितोळा सोनं ७३,७२० रुपयांवर पोहोचलं आहे.