आज संपूर्ण महाराष्ट्राला लाजवणारी घटना पाहायला मिळाली. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी पाहायला मिळाली. काल दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळ केल्यानंतर दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना होती. त्याचं रुपांतर आज हाणामारीत झाल्याचं पाहायला मिळालं.
काल विधानभवनाच्या बाहेर गेटवर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद झाल्याने एकच खळबळ उडाली होती. गोपीचंद पडळकर यांनी कारमधून उतरताना गाडीचा दरवाजा जोरात ढकलला. मात्र, मुद्दाम हा दरवाजा जोरात ढकलला आणि तो मला लागल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यावरुन, या दोन नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली आहे.