गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांच्यातील घटस्फोटाच्या बातम्या पुन्हा वर डोक काढू लागल्या आहेत. यावेळी खुद्द सुनीतानेच गोविंदाच्या अफेअरची पुष्टी दिली.
डेक्कन टॉक्स विथ आसिफशी झालेल्या मुलाखतीत सुनीताने गोविंदासोबतच्या तणावाचे संकेत दिलं आहेत. या मुलाखतीत सुनीता यांना गोविंदासोबतच्या नात्याबद्दल विचारलं असताना त्या म्हणाल्यात की, ‘कोणाची तरी वाईट नजर लागली आहे.’ सुनीता पुढे म्हणाल्यात की, आमच्या प्रेमाला कोणाची तरी वाईट नजर लागली आहे. ती कोणालाही तिचा नवरा हिरावून घेऊ देणार नाही. जोपर्यंत जी जिवंत आहे, तोपर्यंत ती गोविंदाला वेगळं होऊ देणार नाही. मग कोणीही मध्ये आलं तरीही ती गोविंदाला सोडणार नाही. तर पूर्वी गोविंदावर विश्वास ठेवायची. पण आता तो विश्वास राहिला नाही. सुनीता यांच्या या विधानानंतर यूर्जसने अभिनेत्याच्या विवाहबाह्य संबंधांकडे इशारा केला आहे.