गोविंदाच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, अभिनेत्याला अश्रु अनावर

अभिनेता गोविंंदा याचे सचिव शशी प्रभू यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने अभिनेत्याला खूप मोठा धक्का बसला आहे. शशी प्रभू हे केवळ गोविंदा यांचे सचिव नव्हते, तर ते त्यांचे जवळचे मित्रदेखील होते. गोविंदा यांच्या संपूर्ण कारकिर्दीत शशी प्रभू यांची महत्त्वाची भूमिका होती, असे म्हटले जाते.

काही दिवसांपूर्वी शशी प्रभू यांनी गोविंदा व सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या बातम्या निराधार असल्याचे म्हटले होते. अशातच आता शशी प्रभू यांच्या अचानक निघून जाण्याने गोविंदावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. १९८६ मध्ये गोविंदाचा ‘इल्जाम’ चित्रपट प्रदर्शित झाला होता, तेव्हापासून शशी प्रभू त्याच्याबरोबर होते. शशी यांचे केवळ गोविंदाशीच नाही, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाशीही खूप चांगले संबंध होते. त्यामुळे शशी यांच्या अंत्यदर्शनाला गोविंदाने विशेष उपस्थिती दर्शवली.

शशी प्रभू यांच्या निधनाचे वृत्त कळताच गोविंदा त्यांच्या बोरिवली येथील घरी पोहोचले. शशी प्रभू यांच्या अंत्यदर्शनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्याला अतीव दु:ख झाल्याचे दिसत आहे. तसेच अभिनेता आपल्या सहकाऱ्याच्या आठवणीत अश्रू ढाळताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here