अहमदाबादमध्ये अपघात झालेल्या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी

अहमदाबादमधून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान कोसळलं आहे. अहमदाबादवरुन जाणाऱ्या या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघातात ते जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. हे विमान रहिवाशी भागात कोसळले असून विमानात२४२ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मेघानी भागात विमान कोसळल असून धुराचे लोट परिसरात पसरले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here