आयपीएल 2025 मध्ये ५० वा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात पार पडला. या सामन्यात मुंबईने राजस्थानवर तब्बल १०० धावांनी विजय मिळवून सीजनमधील सलग ६ वा सामना जिंकला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या याने नाबाद ४८ धावांची कामगिरी केली. मात्र या दरम्यान हार्दिक पंड्या हा दुखापतग्रस्त होता. त्याला डोळ्यांजवळ दुखापत होऊन ७ टाके सुद्धा पकडले होते. मात्र तरी देखील राजस्थान विरुद्ध सामन्यात त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी सह दमदार खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. मॅचपूर्वी हार्दिकला ही दुखापत झाली होती मात्र ही दुखापत नेमकी कशी झाली याविषयी सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
हार्दिक पंड्या जेव्हा टॉसच्यावेळी मैदानात आला तेव्हा सर्वांना त्याच्या दुखापतीविषयी समजले. कॉमेंटेटर्स त्यांच्या दुखापतीबाबत बोलताना दिसले. मिळालेल्या माहितीनुसार हार्दिकला प्रॅक्टिस सेशन दरम्यान दुखापत झाली होती, जेव्हा तो एका लोकल स्पिनरला स्वीप शॉट मारायला गेला आणि बॉल बॅटला लागून हार्दिकच्या डोळ्याजवळ लागला. ज्यामुळे त्यांचा डोळा थोड्यात बचावला.