हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळे कमी वयात अनेक आजार मागे लागतात. सतत लॅपटॉपवर काम, मोबाईलचा वाढता वापर यामुळे डोळ्यांवर ताण येतो. डोळे हे अतिशय नाजूक असतात. सतत लॅपटॉप समोर बसल्याने डोळे कोरडे होतात, निस्तेज होतात, डोळ्यातून पाणी येणे, जळजळ होणे, थकवा जाणवतो किंवा डोकेदुखीचा त्रास सुरू होतो. अशावेळी डोळ्यांची काळजी घेतली पाहिजे. काम असल्याने लॅपटॉप तर वापरावा लागणारच पण हा सगळा त्रास होऊ नये यासाठी काही सोपे उपाय केले तर त्याचा नक्कीच फायदा होईल आणि डोळ्यांना होणारा त्रास कमी होईल.
डोळ्यांची उघडझाप करा
आठ नऊ तास सतत लॅपटॉप आणि मोबाईल समोर बसून काम करत राहिल्यामुळे डोळ्यांवर ताण येण्यास सुरुवात होते. डोळ्यांवर आलेला ताण कमी करण्यासाठी तुम्ही संध्याकाळच्या वेळी किंवा इतर वेळी 5 ते 10 मिनिटं डोळ्यांची उघडझाप करून व्यायाम करू शकता. हा व्यायाम केल्यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होऊन आराम मिळेल.
20 सेकंदाचा ब्रेक
सतत काम न करता कामात ब्रेक घेणं आवश्यक आहे. ब्रेक घेत काम केल्याने आळस येत नाही. संपूर्ण वेळ कामावर लक्ष केंद्रित केल्यानंतर डोळे दुखण्यास सुरुवात होते. अशावेळी तुम्ही मध्ये मध्ये 20 मिनिटांचा ब्रेक घेतल्यास डोळ्यांवरील ताण कमी होण्यास मदत होईल.
डोळ्यांचा व्यायाम
काम करताना डोळे सावकाशपणे चारही बाजूने फिरवा. डोळे फिरवताना आधी बंद करा आणि मग डोळे फिरवा. हा व्यायाम नियमित केल्यास ताण तणाव कमी होईल.
हाताने मसाज करा
तुम्ही हलक्या हाताने डोळ्यांना मसाज करा म्हणजे आराम मिळेल. डोळे नाजूक असल्याने सावकाश मसाज करा नाहीतर इजा पोहोचेल. डोळ्यांसोबतच कपाळावर सुद्धा तुम्ही मसाज करू शकता.
लॅपटॉप योग्य अंतरावर ठेवा
काम करताना लॅपटॉप किंवा मोबाईल डोळ्यांपासून योग्य अंतरावर ठेवा. साधारणपणे 20 ते 28 इंच अंतरावर ठेवणे डोळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे.