राज्यात काही दिवसांपूर्वी मराठी भाषेच्या वापराबाबत राजकीय वातावरण तापलेलं होतं. राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी “हिंदी ही आता मुंबईची बोलीभाषा बनली आहे. हिंदी ही आमची लाडकी बहीण आहे,” असं वक्तव्य केलं आहे.
हिंदी तर आता मुंबईची बोलीभाषा बनली आहे. आम्ही मराठीला मातृभाषा म्हणतो पण आमच्या तोंडी कधी हिंदी येते, कधी इंग्रजी येते. त्यामुळं हिंदी आता बोलीभाषा बनली आहे. ठाणे व मिरा भाईंदर हा माझा मतदारसंघ आहे. जनतेशी बोलताना शुद्ध मराठीत बोलतो. पण जेव्हा मिरा भाईंदरकडे जातो तेंव्हा आपोआप तोंडातून हिंदी बाहेर पडते. आजकाल आपण मराठी आमची मातृभाषा आहे, आमची माय आहे असं म्हणतो. पण हिंदी आपली लाडकी बहीण आहे. कारण लाडक्या बहिणींमुळं आम्ही आज २३७ च्याही पुढे गेलो आहोत. असं परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं.