वैष्णवी मृत्यू प्रकरणात गृहविभागाने सर्वात मोठी कारवाई केली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्याकडून अतिरिक्त पदभार काढून घेण्यात आला आहे. नाशिक संभाजीनगर नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढला आहे. सुपेकर यांचे नाव वैष्णवी हगवणे यांच्या प्रकरणात जोडण्यात आलं होते. सुपेकर हे सध्या पुणे कारागृहाच्या महानिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. सुपेकर हे शशांक हगवणे याचे मामा असल्याने त्यांचा या प्रकरणात जुळविले गेले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील भूमिका स्पष्ट केली होती. सुपेकरांचा हगवणेला वाचवण्यात सहभाग असेल तर त्यांच्यावर कारवाई करू असं अजित पवार म्हणाले होते.