सायना नेहवाल आणि पती पारूपल्ली कश्यप घेणार घटस्फोट

सायना नेहवाल आणि तिचा पती पारूपल्ली कश्यप वेगळे होणार आहे. दोघेही घटस्फोट घेत असल्याची माहिती स्वत: सायनाने दिली आहे. सायनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रविवारी रात्री उशीरा एक स्टोरी शेअर करत आपण विभक्त होत असल्याचं जाहीर केलं.

भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू असलेल्या सायनाने २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकावर नाव कोरलं. तेव्हापासूनच ती प्रकाशझोतात आली. खरं तर सायना नेहवाल आणि पारूपल्ली कश्यप हे मागील फार वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. त्यांच्या या ओळखीचं रुपांतर नंतर मैत्रीत आणि मग प्रेमात झालं. सायना आणि कश्यप या दोघांची पहिली भेट हैदराबादमधील दिग्गज भारतीय बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद यांच्या अकादमीत झाली, जिथे दोघेही प्रशिक्षण घेत होते. इथूनच त्यांची प्रेमकथा आकार घेऊ लागली. २०१८ मध्ये लग्नबंधनात अडकल्यानंतर आता सात वर्षांनी दोघेही विभक्त होत आहेत. विशेष म्हणजे दोघांचंही लव्ह मॅरेज होतं. दोघेही एक दशक एकमेकांना डेट करत होते. दोघे १४ डिसेंबर २०१८ रोजी विवाहबंधनात अडकले. मात्र लग्नाला सात वर्ष पूर्ण होण्याच्या आतच ते विभक्त होत असल्याची घोषणा सायनाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here