पावसाळ्यातील बदललेले हवामान, चेहऱ्यावरील घाम, तेल, धूळ आणि ओलसरपणा यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण अडकते आणि मुरुमांची उत्पत्ती होते. यावर मात करण्यासाठी या काही सोप्या आणि नैसर्गिक उपायांचा वापर करणे उपयुक्त ठरेल.
1. नेहमीपेक्षा अधिक स्वच्छता
पावसाळ्यात चेहऱ्याची स्वच्छता ही अत्यावश्यक गोष्ट आहे. दिवसातून किमान दोन वेळा पीएच बॅलन्सिंग क्लीन्सर वापरा. जो चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून टाकेल आणि छिद्रे बंद होण्यापासून थांबवेल.
2. एक्सफोलिएशन
आठवड्यातून एक ते दोन वेळा सौम्य एक्सफोलिएटरचा वापर करा. यामुळे मृत पेशी हटून त्वचा श्वास घेऊ लागते. कठोर स्क्रब टाळावे कारण हे त्वचेचे नुकसान करू शकते.
3. आहारात सुधारणा
तळलेले, मसालेदार आणि फास्ट फूड हे पावसाळ्यात मुरुमांना अधिक आमंत्रण देतात. त्याऐवजी ताज्या फळांमध्ये लिंबू, पपई, काकडी, टोमॅटो यांचा समावेश करा. अँटीऑक्सिडंटयुक्त अन्न त्वचेसाठी लाभदायक ठरते.
4. हायड्रेशन
पावसाळ्यात तहान कमी लागते म्हणून पाणी कमी प्यायले जाते, पण ही सवय त्वचेसाठी घातक ठरते. दररोज किमान 8-10 ग्लास पाणी प्या. यामुळे टॉक्सिन बाहेर टाकले जातात आणि हार्मोनल संतुलन राखले जाते.
5. मेकअप टाळा
पावसाळ्यात मेकअप वापरणे टाळा किंवा हलका मेकअप वापरा. मेकअप करताना ही काळजी घ्या की तुमच्या चेहऱ्यावरील छिद्र बंद होणार नाहीत.