सध्या सुरु असलेल्या भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर (Operation Sindoor) , आधार कार्डच्या गैरवापराच्या चिंताजनक अहवालांमुळे भारतीय नागरिकांचा वैयक्तिक डेटा चुकीच्या हातात जाण्याची चिंता निर्माण झाली आहे. पाकिस्तानसारखे देशातील हॅकर्स संरक्षण क्षेत्र आणि UIDAI यासह इतर भारतीय वेबसाइट्सना सातत्याने लक्ष्य करत आहेत. चिंताजनक बाब म्हणजे जर तुमचे आधार कार्ड पाकिस्तानी किंवा इतर कोणाच्या हातात पडले तर त्याचा गैरवापर होऊ शकतो आणि त्याचा वापर हा भारताच्या विरोधातही केला जाऊ शकतो.
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने नागरिकांसाठी एक विशेष टूल उपलब्ध करून दिलं आहे. या टूलच्या माध्यमातून आपल्या आधार क्रमांकाचा इतिहास तपासता येतो आणि कुठे-कधी वापर झाला हे समजून घेता येतं.
आधारचा वापर कोण करतंय हे कसं ओळखायचं?
1. अधिकृत myAadhaar पोर्टल वर जा.
2. आपला आधार क्रमांक आणि कॅप्चा टाका. त्यानंतर नंबरवर येणाऱ्या OTP टाकून लॉगिन करा.
3. पुढे ‘Authentication History’ या विभागात जा.
4. हवी ती तारीख निवडा आणि कोणकोणत्या सेवांमध्ये आधार कार्ड वापरलं गेलं आहे हे पाहा.
5. संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित UIDAI शी संपर्क साधा.
गैरवापर झाला असेल तर काय करायचं?
जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाला आहे असा संशय असेल, तर खालील कोणत्याही माध्यमातून त्वरित तक्रार नोंदवा:
1. मोफत हेल्पलाईन: 1947
2. ईमेल: [email protected]
3. तक्रार नोंदणी वेबसाइट: uidai.gov.in