जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या गुलाबराव पाटील यांनी नुकतीच राज्यसभेची खासदारकी मिळालेले ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्या एका फोनमुळे आपण मंत्री झालो, असं सांगितलं. उज्वल निकम यांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाली, त्यांनंतर काल उज्वल निकम यांच्यासाठी आयोजित कार्यक्रमात पाटील बोलत होते.
भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन यांच्याकडे आपण वशिला लावायचा प्रयत्न केला मात्र काम झालं नाही, असंही गुलाबराव पाटील बोलले.