संभाजीनगरमधील एका कार्यक्रमातील संजय शिरसाट यांचे एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. आता यापुढं ब्लॅकचे पैसे चालणार नाही असे विधान त्यांनी केलं आहे. पुढं जाऊन हे विधान फक्त माझ्यासाठी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. संजय शिरसाट यांच्या या विधानानंतर त्या ठिकाणी हशा पिकला. सोबतच मला आयकर विभागाकडून नोटीस आल्याची त्यांनी भर कार्यक्रमात जाहीर कबुली दिली.
आयकर विभाग असेल किंवा इतर कोणतेही विभाग असतील ते त्यांचं काम करत आहेत. त्यामध्ये चुकीचं काही नाही. २०१९ आणि २०२४ मध्ये संपत्तीमध्ये झालेली वाढ याबद्दलचे त्यांनी स्पष्टीकरण मागितलं आहे. त्यामुळे त्यांचं काम ते करत आहेत. जर इतर लोकांना वाटतं की राजकीय लोकांवर आणि पुढाऱ्यावर कारवाई का होत नाही असं नाहीये. त्यांनी पाठवलेल्या नोटीसला मी उत्तर देणार आहे. काही लोकांनी तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल आयकर विभागाने घेतली. त्यानंतर त्यांनी मला नोटीस पाठवली. त्यांनी ९ तारीख दिली आहे. पण आम्ही त्यांना वेळ मागितला आहे. त्यांना आम्ही उत्तर देणार आहे. यामध्ये गैर असं काही नाही. काही लोकांची पोटदुखी आहे. त्याला आम्ही समर्थपणे उत्तर देऊ. सरकारकडून माझ्यावर कोणताही दबाव नाही असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.