पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटामध्ये बलूच लिबरेशन आर्मीने केलेल्या हल्ल्यात १० पाकिस्तानी सैनिक ठार झाले. बीएलएने शुक्रवारी एक निवेदन जाहीर करून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. बीएलएने म्हटले आहे की, त्यांच्या स्वातंत्र्यसैनिकांनी रिमोट कंट्रोल्ड IEDने पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य केले. हा हल्ला आपल्या स्वातंत्र्यलढ्याचा एक भाग आहे.
वृत्तसंस्था AFPच्या वृत्तानुसार, क्वेट्टापासून सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या मार्गट चेकपोस्टजवळ लष्करी ताफ्याला लक्ष्य करण्यात आले. बीएलएने म्हटले आहे की शत्रूविरुद्ध आमचे ऑपरेशन वेगाने सुरू राहील.