हरियाणाच्या पंचकुलामध्ये एका कुटुंबातील सात जणांनी विष घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी सर्व जण बागेश्वर धाममधील हनुमान कथेत सहभागी झाले होते. या सामूहिक आत्महत्या प्रकरणाचा थरार एकमेव प्रत्यक्षदर्शीने सांगितला आहे. प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, ती कार आमच्या घराजवळ उभी होती. काहींनी आम्हाला सांगितलं की गाडी घराबाहेर उभी आहे. ज्यावर एक टॉवेल ठेवला आहे. आम्ही जेव्हा त्या कुटुंबाला विचारलं तेव्हा कुटुंब प्रमुख प्रविण मित्तल याने सांगितले की, आम्ही बाबाच्या प्रोगॅमहून परत आलो पण हॉटेल नाही मिळालं तर गाडीतच झोपतोय.
प्रवीणचे ऐकून आम्ही त्याला तिथून गाडी काढायला सांगितली, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आम्ही कारच्या आत झाकून पाहिलं तेव्हा कारच्या आतील लोकांनी आत उलट्या केल्याचे आढळले. तेव्हा प्रविण कारबाहेर आला आणि त्याने म्हटले की, मीदेखील विष प्यायलं आहे. आम्ही लोक कर्जात बुडले आहोत. माझे नातेवाईक खूप श्रीमंत आहेत. पण मला कोणी मदत केली नाही. हे ऐकल्यानंतर त्या प्रत्यक्षदर्शीने आत बसलेल्या मुलाला हलवून पाहिले पण त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण याच्यावर १५ ते २० कोटींचे कर्ज होते. तसंच, कर्जामुळं त्याला बँकेने त्याची संपत्तीदेखील जप्त केली होती.
पोलिस आल्यानंतर त्यांनी सर्व मृतदेह बाहेर काढले. तेव्हा कारमधून खूप दुर्गंधी येत होती. तसंच कारमध्ये एक टॅबलेटदेखील पडली होती. प्रवीण एकटेच कारच्या बाहेर पडले होते मात्र काहीच वेळात त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांना एक सुसाइट नोट आढळली आहे. त्यात म्हटलं आहे की, सर्व काही माझ्यामुळे झाले आहे. माझ्या सासऱ्यांना काहीही बोलू नका. मामाचा मुलगा अंतिम संस्कार करेल. मिळालेल्या माहितीनुसार दोन-तीन वर्षे डेहराडूनमध्ये राहिल्यानंतर प्रवीण आणि त्याचे कुटुंब दुसऱ्या ठिकाणी राहायला गेला. गेल्या काही वर्षांत प्रवीणच्या कुटुंबाने अनेक वेळा घर बदलल्याचे समोर आले आहे.