भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील दुसरा टेस्ट सामना हा बर्लिंघमच्या एजबेस्टन क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टीम इंडियाच्या विजयाच्या मार्गात केवळ इंग्लंडचा संघच नाही तर पाऊस सुद्धा अडथळा आणू शकतो. दुसऱ्या टेस्ट सामन्यादरम्यान बर्लिंघम येथील हवामान कसं असेल याविषयी जाणून घेऊयात.
बर्मिंघममधील हवामानाबाबत चांगली माहिती समोर आलेली नाही. दुसऱ्या टेस्ट सामन्यादरम्यान मधून मधून पावसाचं आगमन होऊ शकतं. लीड्स टेस्टमध्ये सुद्धा काही सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली होती. परंतु तसं झालं नाही, पावसाच्या हलक्या सरी पडल्या मात्र त्याचा सामन्यावर फारसा परिणाम झाला नाही. तेव्हा आता दुसऱ्या सामन्यादरम्यान हवामान कसं असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.