कल्याणमधील नांदिवली परिसरात एका खासगी रुग्णालयामधील रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून गोपाल झा असं मारहाण करणाऱ्या परप्रांतीय तरुणाचे नाव आहे. डॉक्टरकडे एमआर बसले आहेत, तुम्ही जरा थांबा असे या तरुणीने सांगितल्याने तरुणीला मारहाण करण्यात आल्याचं पीडितेनं म्हटलं आहे.
याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे. त्याआधारे, मानपाडा पोलीस (Police) आरोपीच्या शोधात आहेत.