दर पाच मिनिटांनी घेतले जातात नागरिकांच्या मोबाईलचे स्क्रीनशॉट!

उत्तर कोरिया! या देशातील हुकूमशाह किम जोंग उनच्या करामतींमुळे तो जगभरामध्ये (कु)प्रसिद्ध आहेच. आता किम जोंग उनचा असाच एक नवा कारनामा ‘बीबीसी’ वृत्तसमूहाने समोर आणला आहे. उत्तर कोरियामधील जनतेचे स्मार्टफोन आता सरकारद्वारे नियंत्रित करण्यात येत असल्याचे ‘बीबीसी’ने अगदी पुराव्यासहीत जगासमोर आणलं आहे. या नव्या नियमामुळे उत्तर कोरियामधील लोकांना देशाबाहेरील कोणतीही माहिती प्राप्त करता येत नाही किंवा स्वतःच्या स्मार्टफोनचा खासगी वापर करता येत नाही, हे स्पष्ट झालं आहे.

उत्तर कोरियातील दैनंदिन जीवन आणि प्रत्येक माहितीसंदर्भात फार काटेकोरपणे सेन्सॉरशीप लावली जाते. त्यामुळेच बीबीसीने तस्करीच्या माध्यमातून उत्तर कोरियातील स्मार्टफोन मिळवला आणि त्याची तपासणी केली. या स्मार्टफोनमधील अँड्रॉईडचे कस्टमाइज व्हर्जन वापरले जाते. त्यामुळे या फोनमध्ये फक्त स्थानिक इंटरनेटशीच फोन कनेक्ट होतो. या इंटरनेटच्या माध्यमातून उत्तर कोरिया सरकारला जी आणि जेवढी माहिती दाखवायची आहे, तीच युझर्सला पुरविली जाते.

सदर स्मार्टफोनचे विश्लेषण करताना एक धक्कादायक बाब समोर आली. ती म्हणजे, या स्मार्टफोनद्वारे गुप्तपणे दर पाच मिनिटांनी स्क्रिनशॉट घेतला जातो. हे स्क्रिनशॉट एका गुप्त फोल्डरमध्ये सेव्ह केले जातात. फोनच्या युझरला हे स्क्रीनशॉट दिसत नाहीत मात्र सरकारी यंत्रणा हे स्क्रीनशॉट पाहू शकतात. जर स्मार्टफोनशी छेडछाड झाली किंवा जर बाहेरच्या देशातील माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला तर तो गुन्हा मानला जाईल, असं सरकारने यापूर्वीच जाहीर केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here