यशराज फिल्म्स निर्मिती असलेला अभिनेता अहान पांडे आणि अभिनेत्री अनित पद्डा यांचा ‘सैयारा’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करत आहे. अवघ्या सहा दिवसांतच या चित्रपटाने 132 कोटींचा टप्पा पार केला असून, येत्या आठवड्यात 150 कोटींचा टप्पा सहज पार करेल अशी अपेक्षा आहे. मुख्यतः Gen Z मध्ये या सिनेमाची क्रेझ आहे.
मोहित सूरी दिग्दर्शित हा रोमँटिक ड्रामा प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला. विशेषतः तरुणांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. चित्रपटातील मुख्य जोडी अहान आणि अनितच्या केमिस्ट्रीचं सोशल मीडियावर भरभरून कौतुक होत आहे. इन्स्टाग्राम रील्स, यूट्यूब शॉर्ट्सपासून ते ट्विटर ट्रेंडपर्यंत ‘सैयारा’ सर्वत्र चर्चेत आहे.