पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी बुधवारी इस्लामाबादमधील ओव्हरसीज पाकिस्तानी कन्व्हेन्शनमध्ये भाषण करताना पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या मुलांना राष्ट्र कसे जन्माला आले हे सांगण्याचं आवाहन केले.”…आपल्या पूर्वजांना वाटलं की आपण जीवनाच्या प्रत्येक बाबतीत हिंदूंपेक्षा वेगळे आहोत,” असं मुनीर म्हणाले. “आपला धर्म वेगळा आहे, आपल्या प्रथा वेगळ्या आहेत, आपल्या परंपरा वेगळ्या आहेत, आपले विचार वेगळे आहेत, आपल्या महत्त्वाकांक्षा वेगळ्या आहेत. द्विराष्ट्र सिद्धांताचा पाया तिथेच घातला गेला. आपण दोन राष्ट्रे आहोत, आपण एक राष्ट्र नाही,” असं ते म्हणाले.
आपल्या पूर्वजांनी मोठा त्याग केला आहे, आणि आपण या देशाच्या निर्मितीसाठी खूप त्याग केला आहे. त्याचं रक्षण कसे करायचे हे आपल्याला माहिती आहे,” असं ते म्हणाले. ते पुढे म्हणाले,”माझ्या प्रिय बंधूंनो, बहिणींनो आणि मुलांनो, कृपया पाकिस्तानची गोष्ट विसरू नका आणि तुमच्या पुढच्या पिढीला पाकिस्तानची कहाणी सांगायला विसरू नका, जेणेकरून त्यांचे पाकिस्तानशी असलेले नाते कधीही कमकुवत होणार नाही. ती तिसरी पिढी असो, चौथी पिढी असो, किंवा पाचवी पिढी असो, त्यांना माहित असेल की पाकिस्तान त्यांच्यासाठी काय आहे”.
यादरम्यान त्यांनी स्थानिक माध्यमांचा हवाला देत त्यांनी बलुचिस्तानमधील दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. “दहशतवाद्यांच्या दहा पिढ्याही बलुचिस्तान आणि पाकिस्तानला हानी पोहोचवू शकत नाहीत,” असं विधान त्यांनी केल्याचं एएनआयने स्थानिक माध्यमांच्या हवाल्याने सांगितलं.