08 मे च्या रात्री, पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज यासह उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी लक्ष्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण भारताने पाकिस्तानचा मनसुबा उधळून लावला. भारताकडून पाकिस्तानची एअर डिफेन्स यंत्रणा उद्ध्वस्त करण्यात आली. या हल्ल्याला प्रतिउत्तर देण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी आज सकाळी पाकिस्तानमधील लाहोरमसह अनेक ठिकाणचं हवाई संरक्षण रडार आणि प्रणालीला लक्ष्य केलं. तसंच लाहोरची हवाई संरक्षण प्रणाली भारतीय सैन्यानं निष्प्रभ केल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय. मात्र भारताच्या या हल्ल्यात पाकिस्तानचं प्रसिद्ध रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम उद्ध्वस्त झालं आहे.
पाकिस्तानकडून भारतातील 4 राज्यांमधील 15 शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न भारताने हाणून पाडला आहे. जम्मू काश्मीर, पंजाब, गुजरात आणि राजस्थान ही राज्ये पाकिस्तानच्या रडारवर होती. हा हल्ला भारताने परतावून लावला. भारतीय सशस्त्र दलांनी आज सकाळी पाकिस्तानमधील लाहोरमसह अनेक ठिकाणचं हवाई संरक्षण रडार आणि प्रणालीला लक्ष्य केलं. तसंच लाहोरची हवाई संरक्षण प्रणाली भारतीय सैन्यानं निष्प्रभ केल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय. भारताकडून हॅरोप ड्रोनचा वापर करण्यात आला. या ड्रोन हल्ल्यात रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम उद्ध्वस्त झालं असून सध्या त्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.