भारत-पाकिस्तान युद्ध थांबलं! नेमकं काय झालं?… घ्या जाणून

भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध अखेर थांबलं आहे. दोन्ही देशांनी शस्त्रसंधीसाठी सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांनी अधिकृतपणे याची घोषणा केली आहे. आज (शनिवारी) दुपारी ५ वाजल्यापासून शस्त्रसंधीची अंमलबजावणी होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सवर पोस्ट करत सर्वात आधी ही माहिती दिली. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानने अधिकृतपणे याला दुजोरा दिला.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांची ९ तळं उद्ध्वस्त करत प्रत्युत्तर दिलं. यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता. पाकिस्तानकडून ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला जात असताना, भारताने मात्र ते परतून लावले आहेत. मात्र आता भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही याला दुजोरा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here