तीन फॉर्मॅटमध्ये संघ क्रिकेट खेळतो मग, कोच वेगवेगळे का नाहीत?: हरभजन सिंह

माजी गोलंदाज हरभजन सिंहने तीन फॉर्मॅटमध्ये भारतीय संघाला खेळवले जात असेल तर कोचही वेगवेगळा हवा असे विधान केले आहे. तो म्हणाला , भारताच्या व्हाईट बॉल आणि रेड बॉल संघासाठी वेगवेगळा कोच अपॉईंट करण्याबाबत विचार झाला पाहिजे. कारण या तीन फॉरमॅटमध्ये भारतीय संघ सुद्धा वेगळा आहे. हरभजनसिंहचं म्हणणं आहे की, जर वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये वेगवेगळे कोच असतील तर वर्कलोड सुद्धा थोडा कमी होईल.

टी 20 वर्ल्ड कप 2024 नंतर गौतम गंभीर हा टीम इंडियाचा हेड कोच बनला होता. तो कोच बनल्यावर व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये टीम इंडियाने चांगले प्रदर्शन केलं, पण टीम इंडियाचा टेस्ट फॉरमॅटमध्ये मात्र संघर्ष करताना दिसतेय. तो कोच बनवल्यापासून टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरिज गमावली आहे. तर आता सुरु असलेल्या इंग्लंड सीरिजमध्ये सुद्धा भारत 1-2 ने पिछाडीवर आहे. आता टीम इंडियाचा माजी गोलंदाज हरभजन सिंहने असा सल्ला दिल्याने गौतम गंभीरला कोचिंग सोडावी लागू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here