दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचा हात, पाकिस्तानच्या आरोपाला भारताचं जोरदार प्रत्युत्तर!

पाकिस्तानमधील पेशावरच्या दिशेने जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेसला हायजॅक करून दहशतवाद्यांनी प्रवाशांना ४४० ओलीस ठेवल्याची घटना नुकतीच घडली. यापैकी २१ प्रवाशांचा मृत्यू झाला असून उर्वरित प्रवाशांची सुटका करण्यात पाकिस्तान लष्कराला यश मिळालं. मात्र, या हल्ल्यावरून पाकिस्तानने ही एक्सप्रेस हायजॅक करण्यात भारताचा हात असल्याचा गंभीर आरोप केला होता. आता पाकिस्तानच्या या आरोपाला भारताने जोरदार प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी हा आरोप केला होता. यावर भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटलं की, “पाकिस्तानने केलेले निराधार आरोप आम्ही फेटाळून लावतो. जागतिक दहशतवादाचे केंद्र कुठे आहे? हे संपूर्ण जगाला माहिती आहे. पाकिस्तानने स्वतःच्या अंतर्गत समस्या आणि अपयशांचा दोष इतरांवर ढकलण्याऐवजी एकदा तरी स्वत:कडे पहावं”, असं म्हणत भारताने पाकिस्तानचे आरोप फेटाळून लावले आहेत. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here