भारताने आता जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा मान मिळवला आहे. याचा अर्थ आता भारतापेक्षा फक्त तीन देश पुढे आहेत.
नीती आयोगाचे सीईओ बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलाय. आयएमएफच्या आकडेवारीनुसार भारताचा जीडीपी आता ४ ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे आहे.
नीती आयोगाच्या १० व्या गव्हर्निंग काऊन्सिल बैठकीनंतर आर. सुब्रह्मण्यम यांनी पत्रकारांशी संवाद साधत अत्यंत महत्वाच्या विषयावर भाष्य केले. ‘सध्या जागतिक राजकीय आणि आर्थिक वातावरण भारताच्या बाजूने आहे. सध्या, मी बोलत असताना भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलाय’, असे त्यांनी सांगितले. आज भारताची अर्थव्यवस्था जपानपेक्षा मोठी झाल्याचे आयएमएफने म्हटलंय.