टीव्ही शो इंडियन आयडल 12 चा विजेता गायक पवनदीप राजन उत्तराखंडहून नोएडाला जात असताना झालेल्या अपघातात जखमी झाला. गजरौला येथे महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या कॅन्टरला त्याची कार धडकली. या अपघातात त्यांचा चालक राहुल सिंग आणि साथीदार अजय मेहरा हेही जखमी झाले. पोलिसांनी तिघांनाही खाजगी रुग्णालयात दाखल केले.
गायक पवनदीपची प्रकृती अजूनही गंभीर आहे. पोलिसांनी दोन्ही नुकसानग्रस्त वाहने ताब्यात घेतली आहेत. उत्तराखंडमधील चंपावत येथील रहिवासी सुरेश राजन यांचा मुलगा पवनदीप हा भारतीय गायन रिअॅलिटी टीव्ही शो इंडियन आयडल १२ चा विजेता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पवनदीप त्याचा मित्र अजय मेहरासोबत घरून नोएडाला जात होता, तेव्हा हा अपघात झाल्याच सांगण्यात येत आहे.