अमेरिकेत चाललंय काय? कॅलिफोर्नियात हिंदू मंदिराची तोडफोड!

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील चिलो हिल्स भागातील स्वामीनारायण संस्थेच्या मंदिरात तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे. तसेच आक्षेपार्ह टीका देखील करण्यात आली आहे.
BAPS ने दिलेल्या माहितीनुसार, काही अज्ञात व्यक्तींनी मंदिराची तोडफोड केली. सध्या भारताकडून याविरोधात कारवाईची मागणी केली जात असून अमेरिकन सरकार मंदिराचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचे म्हटले जात आहे. यामुळे अमेरिकी सरकारवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

BAPS पब्लिक अफेर्सने सोशल मीडियावर या घटनेची माहिती देताना म्हटले की, आणखी एक मंदिर अपवित्र झाले. कॅलिफोर्नियाच्या चिनो हिल्समध्ये हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली. आम्ही हे सहन करणार नाही. संपूर्ण हिंदू समुदाय या द्वेषाच्या विरोधात आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृक निवेदन जारी करत, या घटनेला ‘घृणास्पद कृत्य’ म्हणून संबोधले आहे. तसेच निवेदनात मंत्रालयाने स्थानिक कायद्यानुसार, कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच प्रार्थना स्थळांची पुरेसी सुरक्षा सुनिश्चित करण्याचेही आवाहन केले आहे. या घटनेसाठी कायदा अंमलबाजावणी अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले आहे.

हिंदू मंदिरांच्या तोडफोडीची ही पहिलीच घटना नाही. याआधी कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटो येथील BAPS हिंदू मंदिराचे नुकसान करण्यात आले होते. मंदिराच्या भिंतीवर हिंदूंनो परत जा! अशा घोषणा लिहिण्यात आल्या होत्या.आता अमेरिका यावर काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here