4 फेब्रुवारी रोजी अमेरिकेने 104 बेकायदेशीर भारतीयांना मायदेशी पाठवले. सध्या त्यावरून राजकारण तापलं आहे. अमेरिकेने भारतात पाठवण्यासाठी आणखी ४८७ बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांची ओळख पटवली असून, या भारतीयांना मायदेशी पाठवले जाणार आहे, असे भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितले.

भारतीयांना मायदेशी पाठवताना कोणतेही गैरवर्तन होऊ नये, याची यापुढे काळजी घेतली जाईल, असे विक्रम मिस्री यांनी सांगितले. जर असे कोणतेही प्रकरण आमच्या लक्षात आले तर आम्ही ते अमेरिकेसमोर उपस्थित करू, असे ते म्हणाले. ४ फेब्रुवारी रोजी भारतीयांना मायदेशी पाठवताना त्यांना बेड्या ठोकण्याचा मुद्दा अमेरिकन अधिकाऱ्यांसमोर उपस्थित करण्यात आल्याचे मिस्री यांनी सांगितलं.