भारत-पाकिस्तान संघर्षाचा परिणाम आयपीएलवरही, सामना मध्येच झाला बंद!

भारत-पाकिस्तान तणावाचा परिणाम आता आयपीएल 2025 वरही होत आहे. आयपीएल एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली आहे. एवढंच नाही तर ८ मे रोजी धर्मशाळा येथे सुरु असलेल्या सामन्याला अचानक थांबण्यात आलं. सामना मध्यभागी थांबवण्यात आला आणि संपूर्ण स्टेडियममध्ये ब्लॅकआउट करण्यात आला. हा सामना धर्मशाळा येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये खेळला जात होता. पण सामान्यांच्या 10.1 षटकांनंतर अचानक सामना थांबवण्यात आला. काही काळातच स्टेडियम रिकामे करण्यात आले. सुरुवातीला सामना थांबवण्याचे कारण फ्लडलाइट्समधील बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. पण नंतर काही वेळेतच समजले की धर्मशाळाच्या शेजारील शहर जम्मू आणि पंजाबमध्ये हवाई हल्ला झाला आहे आणि यामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला. आता आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी याबाबत माहिती दिली.

आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ म्हणाले की, ” स्ट्रॅटेजिक टाइमआउट दरम्यान ब्लॅकआउट प्रोटोकॉलबद्दल मला माहिती देण्यात आली. आमच्याकडे खूप कमी वेळ होता. मी पटापट हालचाली केल्या आणि लगेचच दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्जच्या टीममधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले की, काही वेळात लाईट बंद केले जातील आणि आम्ही लोकांना बाहेर काढायचे हे काम कसे पार पाडायचे याचा प्लॅन करत आहोत. जेव्हा फ्लडलाइट्स बंद करण्याची घोषणा करण्यात आली तेव्हा लोक बाहेर पडायला तयार न्हवते. खरतर त्यावेळी पंजाब एकदम जबरदस्त पद्धतीने फलंदाजी करत होता, त्यामुळे सामना खूपच मस्त सुरु होता. पण स्थानिक पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीने काम करण्यात आले. त्यांच्याशिवाय हे संपूर्ण काम शक्य नव्हते. त्यांनी खूप छान काम केले. कमीत कमी वेळेत सर्वकाही सुरळीतपणे घडेल याची खात्री करणे हे एक आव्हान होते. पण, स्टेडियममध्ये शिस्त पाळणारे प्रेक्षक होते ज्यांनी घोषणेनंतर जास्त निषेध न करता स्टेडियममधून बाहेर पडले.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here