आयपीएलचं नवं वेळापत्रक जाहीर पण…शेवटचा सामना…

भारत-पाकिस्तानमधील तणावामुळे स्थगित करण्यात आलेली आयपीएल स्पर्धा १७ मे पासून पुन्हा एकदा खेळवली जाणार आहे. बीसीसीआयने १२ मे रोजी आयपीएलचं नवं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार ६ ठिकाणी १७ सामने खेळवले जाणार आहेत. अंतिम सामना ३ जून रोजी खेळवला जाईल. सुधारित वेळापत्रकात दोन डबल-हेडर सामने समाविष्ट आहेत, जे दोन रविवारी खेळवले जातील.

आता नव्या वेळापत्रकाप्रमाणे IPL 2025 चा फायनल सामना हा ३ जून रोजी खेळवला जाईल. मात्र अजूनही फायनल सामना नेमका कुठे होणार याबाबत स्पष्ट करण्यात आलेलं नाही. नव्या वेळापत्रकानुसार कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवर आता आयपीएल 2025 चे उर्वरित लीग स्टेज सामने सुद्धा होणार नाहीत. त्यामुळे फायनल सामना सुद्धा तिथे होणार नाही.

आयपीएल 2025 चा फायनल सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शिफ्ट केला जाऊ शकतो. त्यामुळे लाखो प्रेक्षकांना याची देही याची डोळा फायनल सामना पाहण्याची संधी मिळू शकेल. IPL 2025 चा क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर सामना हा हैदराबादमध्ये खेळवला जाणार होता तर क्वालिफायर 2 कोलकातामध्ये होणार होती. परंतु रिपोर्ट्सनुसार क्वालिफायरचे दोन्ही सामने हे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवले जाऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here